भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुडविलें जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका

bahudavilen jan man jhalen nishchal | chukavuni kolhal ala tuka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुडविलें जन मन झालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥ पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥ घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥२॥ तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥३॥