भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु पुण्य होय गांठीं । तैच ऐशियाची भेटी । तयाचिये कृपादृष्टी । सहज ब्रह्मा लाभे मनुष्या

bahu punya hoy ganthin | taich aishiyachi bheti | tayachiye krupadrushti | sahaj brahma labhe manushya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु पुण्य होय गांठीं । तैच ऐशियाची भेटी । तयाचिये कृपादृष्टी । सहज ब्रह्मा लाभे मनुष्या ॥१॥ देही असोनि विदेहि । करुनी कर्म अकर्ते पाही । वैषम्याची नाहीं । वाटाघाटी तयांसी ॥२॥ देहीं कष्ट किंवा सुख । शीतौष्ण समान देख । वाउगाचि शोक । नाहीं जया मानसीं ॥३॥ तोचि जाणा ब्रह्माज्ञानी । वाया न बोले बोलोनि मौनी । लक्ष्मी सदा परध्यानीं । एका जनार्दनीं तो धन्य ॥४॥