भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु क्षेत्रें बहु तीर्थ । बहु दैवतें असतीं

bahu kshetren bahu tirtha | bahu daivaten asatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु क्षेत्रें बहु तीर्थ । बहु दैवतें असतीं ॥१॥ परी नये पंढरीराम । वाउगा श्रम होय अंतीं ॥२॥ देव भक्त आणि नाम । ऐसें उत्तम नाहीं कोठें ॥३॥ एका जनर्दनी तिहींचा मेळ । पाहतां भूमंडळ पंढरीये ॥४॥