भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं

bahu janmantaren phere | kele yere sodavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥१॥ आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥ वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥२॥ तुका म्हणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥