भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं

bahu duravari | vethi ojhen hoten shirin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥१॥ आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥ बहु काकुलती । आसे मागें किती ॥२॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥३॥