भजनी मालिका
← भजनांकडे परत

आयुष्य सरतां न लगे वेळ । यम काळ उभाची

ayushya saratan na lage vel | yam kal ubhachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आयुष्य सरतां न लगे वेळ । यम काळ उभाची ॥१॥ म्हणोनियां लाहो करा । सप्रेम आळवावें ॥२॥ धरा संतासमागम । करा सप्रेम कीर्तन ॥३॥ जावें सुखें पंढरीसी । नाचा सरसें वाळुवंटीं ॥४॥ एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । होतां लाभा नोहे तुटी ॥५॥