भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविश्वासापुढें । परमार्थ कायसें बापुडें

avishvasapudhen | paramartha kayasen bapuden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अविश्वासापुढें । परमार्थ कायसें बापुडें ॥१॥ अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ॥२॥ सदा पोटीं जो अविश्वासासी । तोचि देखे गुणदोषासी ॥३॥ सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास तोचि जनीं ॥४॥ एका जनार्दनीं विश्वास । नाहीं त्यास भय कांहीं ॥५॥