भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं

avatar gokulin ho jan taravayasi | lavanyarupaden he tejapunjalarasi | ugavatan koti bimben ravi lopale shashi | utsav suravaran mahi thor manasin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता। आरती ओंवाळीन तुम्हां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥ वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ । दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥ राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरी । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं । राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी। निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥ कौतुक पाहावया माव ब्रह्म्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं । गोपाळ गाईवत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥४॥ तारिलें भक्तीजना दैत्य निर्दाळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी । गुण मी काय वर्णु मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देई चरणीं ॥५॥