भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवंती क्षेत्रवासी । होते संदीपन ऋषी

avanti kshetravasi | hote sandipan rushi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवंती क्षेत्रवासी । होते संदीपन ऋषी ॥१॥ कृष्ण बळिराम सुदामा । आले सदगुरुच्या ग्रामा ॥२॥ लोटांगण नमन करिती । कर जोडोनि तिष्ठती ॥३॥ स्वामी करा अंगीकार । आम्ही विद्यार्थी अनुचर ॥४॥ अनन्य भावें आलों शरण । एका विनवी जनार्दन ॥५॥