भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घरोघरीं

avaghen kshetra pandhari | avagha anand gharogharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघें क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घरोघरीं ॥१॥ अवघा विठ्ठलचि देव । अवघा अवघिया एक भाव ॥२॥ अवघे समदृष्टी पहाती । अवघे विठ्ठलाचि गाती ॥३॥ अवघे ते दैवाचे । एका जनार्दनीं साचे ॥४॥