भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी

avaghen jenen pap nase | ten hen ase pandharisi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥१॥ गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥ अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥२॥ तुका म्हणे जवळी आलें । उभे ठालें समचरणीं ॥३॥