भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे जन्म उत्तम । वाचे स्मरा रामनाम

avaghe janma uttam | vache smara ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघे जन्म उत्तम । वाचे स्मरा रामनाम ॥१॥ अवघे वदती नाम साचें । धन्य धन्य ते दैवाचे ॥२॥ संतसंग सदा । अवघा तया हाचि धंदा ॥३॥ अवघे वर्ण उत्तम । भेदाभेद नाही काम ॥४॥ अवघा एका जनार्दन । भेदाभेदाचें नाहीं कारण ॥५॥