भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें

avagha venchalon indriyanche odhi | jalen ten ten ghadi niropilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥१॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥ कायावाचामनें तोचि निजध्यास । एथें जालों ओस भक्तीभावें ॥२॥ तुका म्हणे करूं येईल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥३॥