भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम

avadisarikhen sampadilen song | anant hen mag jalen nam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥ हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥२॥ तुका म्हणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूर्ती ॥३॥