भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीनें धरिलीं नांवें । प्रियभावें चिंतन

avadinen dharilin nanven | priyabhaven chintan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीनें धरिलीं नांवें । प्रियभावें चिंतन ॥१॥ वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥ निचाड हा चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥२॥ धरिला मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायीं ॥३॥