भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे

avadinen bhaven harinam ghesi | tujhi chinta tyasi sarva ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ नको खेद धरुं कोणत्या गोष्टीचा । पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥ सकळ जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥ जैशी स्थिति आहे तैशापरी राहे । कौतुक तू पाहें संचिताचें ॥४॥ एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा । हरिकृपे त्याचा नाश झाला ॥५॥