भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीच्या मतें करिती भोजना । भोग नारायणें म्हणती केला

avadichya maten kariti bhojana | bhog narayanen mhanati kela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीच्या मतें करिती भोजना । भोग नारायणें म्हणती केला ॥१॥ अवघा देव म्हणे वेगळें तें काइ । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥ लाजे कमंडलु धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणासी ॥२॥ शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥ तुका म्हणें यांस देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥