भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवाडी जाती पंढरीसी । अहर्निशी ते वारकरी

avadi jati pandharisi | aharnishi te varakari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवाडी जाती पंढरीसी । अहर्निशी ते वारकरी ॥१॥ तयांचे पायीं माझे भाळ । सर्वकाळ असो देवा ॥२॥ हातीं टाळ मुखीं नाम । नेणती सकाम दुसरें ॥३॥ एकविध तयांचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥