भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग

avade pandhari bhima pandurang | chandrabhaga ling pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥ तुका म्हणे जीवा थोर झालें सुख । नाठवे हे भूक तहान कांहीं ॥३॥