भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडे हें रूप गोजिरें सगुण

avade hen rup gojiren sagun

आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥ आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥ लांचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें झालें ॥२॥ तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥३॥