भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन

avade devasi to aika prakar namacha uchchar ratrandin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन ॥१॥ तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा । हृदयीं कळवळा वैष्णवांचा ॥२॥ आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । साधन निर्धारी आन नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा ज्याचा नेम । तो देवा परमपूज्य जगीं ॥४॥