भजनी मालिका
← भजनांकडे परत

अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी

ati jalen uttam veshyechen lavanya | pari te savasin na mhanavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥२॥ तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईविण नाहीं ॥३॥