भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येथें झाली जीवा संवसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें

atan yethen jhali jiva sanvasati | hoten taisen potin phal alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां येथें झाली जीवा संवसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥१॥ आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥ आतां हा अळस असो परता दुरी । नेदावी तें उरी उरों कांहीं ॥२॥ आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥३॥ आतां लोकलाज नयो येथें आड । बहु झालें गोड ब्रम्हरस ॥४॥ तुका म्हणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ स्थिरावला ॥५॥