भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करील वांयां

atan yenenvin nahin amhan chad | kon badabad karil vanyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करील वांयां ॥१॥ सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥ तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥