भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज

atan tujhen nam gat asen gitin | mhanoni maniti lok maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥ अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥ सज्जन संबंधी तुटली उपाधी । रोकडा या बंदीं सुटलोंसें ॥२॥ घ्यावा द्यावा कोणें करावा सायास । गेली आशापाश वारोनियां ॥३॥ तुका म्हणे तुज कळेल तें आतां । करा जी अनंता मायबापा ॥४॥