भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी

atan tujha bhav kalon ala deva | thakuniyan seva ghesi majhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥ टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥ स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥२॥ जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥३॥ तुका म्हणे नाहीं आलें अनुभवा । आधीं च मी देवा कैचा नाचू ॥४॥