भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा

atan tari pudhen hachi upadesh | naka karun nash ayushyacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥