भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां तरी मज सांगा साच भावे । काय म्यां करावें ऐसें देवा

atan tari maj sanga sach bhave | kay myan karaven aisen deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां तरी मज सांगा साच भावे । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥ चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघा चि ॥ध्रु.॥ कळे म्हणवूनी करीतसे वाद । दिसे भेदाभेद अंतरीचा ॥२॥ तुका म्हणे नको पाहूं तू निर्वाण । देई कृपादान याचकासी ॥३॥