भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां तळमळ । केली पाहिजे शीतळ

atan talamal | keli pahije shital

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥१॥ पाहा करील तें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥ तोचि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥२॥ तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरवसा ॥३॥