भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकलीलों

atan sandun tari hatin na padarin | sakhin sahodarin mokalilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकलीलों ॥१॥ जनाचारामध्यें उडाला पातेरा । झालों निलाजिरा म्हणऊनि ॥ध्रु.॥ कोणाचिया दारा जावेनासें झालें । म्यां च विटंबिलें आपणासी ॥२॥ कां न झाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें झालें ॥३॥ तुका म्हणे तुज भक्त झाले फार । म्हणोनियां थार नाहीं येथें ॥४॥