भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पाविजेल घरा । या दातारा संगती

atan pavijel ghara | ya datara sangati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥ पायावरी ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥ येथून तेथवरी आतां । नाहीं सत्ता आणिकांची ॥२॥ तुका म्हणे चक्रपाणी । शिरोमणी बळियांचा ॥३॥