भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा

atan hoi majhe buddhicha janita | avaraven chitta panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां होई माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥१॥ येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥ अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥२॥ तुका म्हणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥३॥