भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं

atan hen uchit majhen jana hatin | pahije phajiti keli kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं ॥१॥ मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येईल ठाया ॥ध्रु.॥ वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां चांडाळा बुद्धी मज ॥२॥ तुका म्हणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥३॥