भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां हें शेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्पे

atan hen shevatin ason payanvari | vadati vaikhari vagapushpe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां हें शेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्पे ॥१॥ नुपेक्षावें आम्हां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुह्मीं ॥ध्रु.॥ वोळवुनी देह सांडियेली शुद्ध । सारियेला भेद जीव शिव ॥२॥ तुका म्हणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी ॥३॥