भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें

atan ghei majhen | bhar sakal hi ojhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥ काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥ तूं चि डोळे वाती। होई दीपक सांगातीं ॥२॥ तुका म्हणे कांहीं । विचाराया चाड नाहीं॥३॥