भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें

atan baren gharichyagharin | apali uri apanapen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें ॥१॥ वाइट बरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥ बोलों जातां वाढे बोल । वांयां फोल खटखट ॥२॥ काकुलती यावें देवा । तो तों सेवा इिच्छतो ॥३॥ हिशोबाचे खटखटे । चढे तुटे घडेना ॥४॥ तुका म्हणे कळों आलें । दुसरें भलें तों नव्हे ॥५॥