भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां बरे जाले । माझे माथांचे निघाले

atan bare jale | majhe mathanche nighale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां बरे जाले । माझे माथांचे निघाले ॥१॥ चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥ नसतां कांहीं जोडी । केली बहुते तडातोडी ॥२॥ जाला झाडापाडा । तुका म्हणे गेली पीडा ॥३॥