भजनी मालिका
← भजनांकडे परत

आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी

asuri svabhav nirday antar | manasin nishthur ativadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥१॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥ काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्षी देतें ॥२॥ तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांठविलें ॥३॥