भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा

asoni sansarin apada | vache vade viththal sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असोनि संसारीं आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा ॥१॥ नाहीं मानसीं तळमळ । सदा शांत गंगाजळ ॥२॥ असोनियां अंकिंचन । जयाची वृत्ति समाधान ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें थोडे । लक्षामध्येंअ एक निवडे ॥४॥