भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी

asoni na dise vegalachi ase | to pandharisi vase vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी ॥१॥ कैवल्य उघडें राहिलेंसे उभे । कर्दळींचें गाभे समपदीं ॥२॥ द्वैत अद्वैत विरहित सचेतनीआं उभा । एका जनार्दनीं शोभा गोजिरी ती ॥३॥