भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनी देहीं आम्हीं विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायीं

asoni dehin amhin videhi bhai | natalon karma akarmachen thayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असोनी देहीं आम्हीं विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायीं ॥१॥ माझें नवल म्यांच पाहिलें डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥ काय सांगु नवलाची कहाणी । पाहतें पाहणें बुडाले दोन्हीं ॥३॥ न पहावें न देखवें नायकावें कानीं । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥४॥