भजनी मालिका
← भजनांकडे परत

असत्याचें मूळ नरदेह साचें । वायां काय याचे कवतूक

asatyachen mul naradeh sachen | vayan kay yache kavatuk

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असत्याचें मूळ नरदेह साचें । वायां काय याचे कवतूक ॥१॥ हरिनाम सार सेवीं तूं निर्धारें । आणीक पसार शीण वायां ॥२॥ एका जनार्दनीं मृगजळ वोखटें । दिसें तें गोमटें तृषा न हारे ॥३॥