भजनी मालिका
← भजनांकडे परत

असत्याचा शब्द नको वाचे माझें । आणिक हो का वोझें भलतैसें

asatyacha shabda nako vache majhen | anik ho ka vojhen bhalataisen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असत्याचा शब्द नको वाचे माझें । आणिक हो का वोझें भलतैसें ॥१॥ परि संतरज वंदीन मी माथां । असत्य सर्वथा नोहे वाणी ॥२॥ अणुमात्र रज डोळां न साहे । कैसा खुपताहे जन दृष्टी ॥३॥ एका जनार्दनीं असत्याची वाणी । तोचि पापखाणी दुष्टबुद्धि ॥४॥