भजनी मालिका
← भजनांकडे परत

असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे

asankhya vachane asoni nasati | kon taya riti chalatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असंख्य वचने असोनी नसती । कोण तया रीती चालतसे ॥१॥ प्रमाण अप्रमाण देहींचा निवाडा । केलासे उघडा श्रुतींशास्त्रीं ॥२॥ हरि नाम वचन एकचि प्रमाण । हें तो अप्रमाण करील कोण ॥३॥ जनार्दनाचे वचनीं द्यावे अनुमोदन । एका जनार्दनीं प्रमण तेंचि होय ॥४॥