भजनी मालिका
← भजनांकडे परत

आसनीं भोजनीं शयनीं । जो चिंती रुप मनीं

asanin bhojanin shayanin | jo chinti rup manin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आसनीं भोजनीं शयनीं । जो चिंती रुप मनीं ॥१॥ जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । सदा ध्यान रुप चित्तीं ॥२॥ नसे आणिके ठायीं मन । एका शरण जनार्दन ॥३॥