भजनी मालिका
← भजनांकडे परत

असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडों ना

asal te tumhi asa | amhi sahasa nivadon na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असाल ते तुम्ही असा । आम्ही सहसा निवडों ना ॥१॥ अनुसरलों एका चित्तें । हातोंहातें गींवसित ॥ध्रु.॥ गुणदोष काशासाठी । तुमचे पोटीं वागवूं ॥२॥ तुका म्हणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥३॥