भजनी मालिका
← भजनांकडे परत

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया

as nirasali govindache bheti | sanvasara tuti pudhiliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥ पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥ हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरी आले ॥३॥ आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥ लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥५॥ आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥६॥