भजनी मालिका
← भजनांकडे परत

आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेती नाहीं

arusha vachanin matechi avadi | mhanauni tantadi gheti nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥ काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥ लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठा सांडी ॥२॥ तुका म्हणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥३॥