भजनी मालिका
← भजनांकडे परत

आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां

arte arati datta vovalun jatan | aratichen haran datten kelen tattvatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आर्ते आरती दत्त वोवाळूं जातां । आरतीचें हरण दत्तें केलें तत्त्वतां ॥१॥ आरती खुंटली आतां वोवाळूं कैसें । तरी निजभजनें निरंजन होतसे ॥२॥ आरतीचे आर्त पुरवी श्रीदत्त । एका जनार्दनीं सहज वोवाळीत ॥३॥