भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे माझ्या मना । नित्य भजे नारायणा

are majhya mana | nitya bhaje narayana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अरे माझ्या मना । नित्य भजे नारायणा ॥१॥ तेणें तुटेल बंधन । उभय लोकीं कीर्ति जाण ॥२॥ मिळेल सकळ संपत्ति । नाश पावेल विपत्ति ॥३॥ प्राप्त होय ब्रह्मापद । वाचे वदावा गोविंद ॥४॥ एका जनार्दनीं मन । सदा चिंती नारायण ॥५॥